विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार कामगिरीनंतर आता जसप्रीत बुमराह खेळणार का, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र या संदर्भात स्पष्ट माहिती समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरात संघाकडून बुमराह खेळताना दिसणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यस्त कार्यक्रम आणि फिटनेस लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात असून चाहत्यांना मात्र बुमराहच्या सहभागाची प्रतीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे. – Tiranga Times Maharastra
रोहित-विराटनंतरही विजय हजारे ट्रॉफीत बुमराहचा सहभाग नाही, गुजरात संघाने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
